खाजगी दवाखान्यानी आयसीयू व कोरोना बेडची संख्या तात्काळ वाढवावी – हसन मुश्रीफ

खाजगी-दवाखान्यानी-आयसीयू- Private-dispensary-ICU

कोल्हापूर शहरासह सबंध जिल्ह्यातील खाजगी दवाखान्यानी आयसीयू बेड व कोरोना बेडची संख्या तात्काळ वाढवावी, असे आवाहन कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. महापालिका आयुक्तांनीही आपत्कालीन परिस्थितीच्या कायद्याचा अभ्यास करून अश्या वाढीव सुविधा करण्याचे आदेश द्यावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या आहेत.
कोरोना महामारीच्या संदर्भाने या दवाखान्याबद्दल काही कमी-अधिक तक्रारी असतीलही. तरीसुद्धा कोविडबाबत त्यांनी केलेले काम चांगले आहे. ते चांगले काम करीत आहेत. कोरोनाच्या वाढतच चाललेल्या संसर्गामूळे कोल्हापूर जिल्ह्यातील विशेषता कोल्हापूर शहरातील खाजगी दवाखान्यावरील ताण वाढत चालला आहे असे सुद्धा त्यांनी बोलून दाखविले होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांकडे ज्यांच्या खिशाला परवडतील असे पैसे आहेत, ते खाजगी दवाखान्यात ऍडमिट होण्याचा आग्रह धरतात. तसेच ज्यांना लक्षणे नाहीत आणि सरकारी दवाखान्यामध्ये जाण्याची इच्छा नाही, असे लोकही खाजगी दवाखान्यांमध्ये जाण्याचा आग्रह धरतात.

त्याशिवाय आपल्याला लागूनच जवळच असलेल्या कोकणामधून, सांगली व इतर जिल्ह्यातून तसेच जवळच असलेल्या कर्नाटकच्या भागांमधून येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेने प्रत्येक दवाखान्यात अधिकाऱ्यांची नेमणूक करून सर्व लोकांना बेड उपलब्ध होतील, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना मुश्रीफ यांनी दिल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here