Skip to content Skip to footer

माफी मागा अन्यथा, कोल्हापुरी हिसका दाखवू : शिवसेनेचा एशियन पेंट कंपनीस इशारा

एशियन पेंट कंपनीने राजर्षी शाहू महाराजांच्या समृद्ध कोल्हापूरची तुलना पाश्चिमात्य सिंगापूरशी करून दक्षिण काशी संबोधल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहराचा अवमान करणारी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

कोल्हापूरचा अवमान करणारी ही जाहिरात तात्काळ बंद करून एशियन पेंट कंपनीने कोल्हापूरवासीयांची जाहीर माफी मागावी, अन्यथा एशियन पेंट कंपनीस कोल्हापुरी हिसका दाखवू, अशा इशारा शिवसेनेच्या वतीने आज देण्यात आला.

एशियन पेंटने बनविलेल्या एका जाहिरातीमध्ये कोल्हापूरचा अवमान करून हिणविल्याचा प्रकार करण्यात आला आहे.याबाबत शिवसेना कोल्हापूर शहरच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निदर्शने करण्यात आली.

यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “कोल्हापूरचा अवमान करणाऱ्या एशियन पेंट कंपनीचा धिक्कार असो”, “एशियन पेंट हाय हाय”, “एशियन पेंट कंपनीचा बहिष्कार असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी एशियन पेंटच्या प्रतिकात्मक वस्तूचे दहन करण्यात आले.

Leave a comment

0.0/5