फुल टाईम आणि पार्ट टाईम लोकप्रतिनिधी कोण आहे – डॉ श्रीकांत शिंदे

फुल-टाईम-आणि-पार्ट-टाईम-लो- Full-time-and-part-time-low

ट्विटरवर मागणी आणि ट्विटरवर फॉलोअप घेणाऱ्या आमदारांनी प्रत्यक्षात कल्याण शीळ रोडवर फेरफटका मारावा, जेणेकरुन कल्याण शीळ रोडवर कुठे काम सुरु आहे हे कळेल असे उत्तर शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मनसे

आमदार राजू पाटील यांच्या टीकेला दिले आहे. यावरून सेना-मनसे राजकारण चांगलेच तापलेले दिसून येत आहे.
या टीकेनंतर मनसे आमदार पाटील यांनी “मला फेरफटका मारण्याची गरज नाही. मी या मतदारसंघातच राहतो. मला या मतदारसंघाची पूर्ण माहिती आहे. मतदारसंघ हेच माझं घर आहे. आता राजकारण न करता खड्डे भरण्याचं काम करा” अशी टीका केली होती.

यावर आमदार राजू पाटील यांनी माझ्या बोलायचे दाखल घेतली आणि ते रस्त्यावर उतरले याबद्दल त्यांचे धन्यवाद ! फुल टाईम आणि पार्ट टाईम लोकप्रतिनिधी कोण आहे, हे जनतेला चांगलंच माहिती आहे. चार महिने ट्विटरवर कोण होतं आणि रस्त्यावर उतरुन कोणी कामं केली हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी मला कोण फुल टाईम आणि पार्ट टाईम हे सांगू नये असा टोला पाटील यांना खासदार शिंदे यांनी लगावला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here