Skip to content Skip to footer

राज्यातील जिम सुरु करण्यास शासन साकारात्मक – मुख्यमंत्री

राज्यातील जिम सुरु करण्यास आघाडी सरकार सकारात्मक आहे. मात्र जिम सुरु केल्यानंतर कोव्हिडचा प्रसार होऊ नये यासाठी जिम चालकांनी आणि मालकांनी एकत्रितपणे संसर्ग रोखण्यासाठी करावयास असलेली मार्गदर्शक तत्वे शासनाला सादर करावी त्याद्वारे जिम सुरु करण्याचा निर्णय शासन घेऊ शकते असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

जिम चालक आणि व्यवस्थापकांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन जिम पुन्हा सुरु करण्यासाठी सविस्तर चर्चा केली. मात्र जिम सुरु करताना कोरोनाच्या संसर्गाला रोखणे मोठे आव्हान असणार आहे. त्यासाठी सर्व जिम मालकांनी एकत्र येऊन नारिकांच्या दृटीने काही मार्गदर्शक तत्वे ठरविणे आवश्यक आहे. असे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5