इ-पास रद्द होणार, मुख्यमंत्र्यांनी बोलावली आज बैठक

इ-पास-रद्द-होणार-मुख्यमंत- E-pass-cancel-will-chief

केंद्र सरकारकडून अनलॉक ४ साठी मार्गदर्शक तत्वे जरी करण्यात आलेली आहे. त्यासाठी आज ठाकरे सरकारकडून लवकरच या बाबतचा निर्णय जारी होणार आहे. या अंतर्गत इ-पास बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक बोलावली आहे. ई-पास सुरुच राहणार की हद्दपार होणार याबाबत आजच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे

राज्यभरात ई-पास संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. कारण शहरे सोडून अद्याप ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात आलेला नाही याच पाश्वभूमीवर अद्यापही खासगी वाहनांनी प्रवास करण्यासाठी ई-पास अनिवार्य आहे.

त्यासंदर्भात उद्या एक महत्त्वाची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. या बैठकीला राज्यातील सचिव आणि गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील ई-पास रद्द होण्याची शक्यता बळावली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here