हिंदू मंदिर उघडा सांगणारे तुम्ही कोण ? चंद्रकांत खैरे

कोरोनाच्या पाश्वभूमीवर मागील चार महिन्यापासून बंद असलेली मंदिरे पुन्हा उघडण्याच्या मुद्यावरून राजकारण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. काही दिवसापूर्वी भाजपाने मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन केले होते त्यापाठोपाठ वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा पंढरपूर येथे कार्यकर्त्यांसह आंदोलन केले होते.

आता त्याच पावलावर पाऊल ठेवत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील याने सुद्धा मंदिरे उघडण्याच्या प्रश्नावरून राजकारण सुरु केले आहे. मात्र या निर्णयाला संभाजीनगर येथील माजी शिवसेना खासदासर चंद्रकांत खैरे यांनी विरोध दर्शवला आहे.

हिंदू मंदिरं उघडा सांगणारे तुम्ही कोण?, असा सवाल चंद्रकांत खैरेंनी खासदार इम्तियाज जलील यांना विचारला आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. सध्या कोरोनाच्या परिस्थितीत मंदिरे उघडून गर्दी झाली तर मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग संभाजीनगर मध्ये होऊ शकतो हा मुद्दा आवर्जून खैरेंनी मांडला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here