कंगनाने मुंबई पोलिसांवर केलेल्या वक्तव्यची माफी मागावी अन्यथा तिच्यावर ५० कोटीच्या मानहानीचा दावा ठोकू असा इशारा निवृत्त पोलीस अधिकाऱ्यानी तिला दिला आहे. या संदर्भात तिला नोटीस पाठवण्यात आलेली आहे अशी माहिती सुद्धा निवृत्ती सहाय्यक अधिकाऱ्याने दिली आहे.
कंगनाने काही दिवसापूर्वी ट्विट करून मुंबई पोलिसांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी टीका केली होती. दिवसरात्र नागरिकांच्या सुरक्षितेसाठी झटणाऱ्या मुंबई पोलिसांवर आशा प्रकारे आरोप लावणे आणि बदनामीकारक ट्विट करणे चुकीचे आहे.
त्यामुळे सदर प्रकरणात केलेल्या वक्तव्याची माफी मागावी अन्यथा तिच्यावर ५० कोटींचा मानहानीचा दावा ठोकू अशी नोटीस निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त प्रदीप लोणंदकर यांनी कंगनाला पाठवली आहे. दरम्यान कंगनाने मुंबई सुरक्षित वाटत नसल्यामुळे तिने केंद्राकडे सुरक्षा मागितली होती तिच्या या मागणीचा विचार करून तिला “वाय” दर्जाची सुरक्षा केंद्राकडून पुरवण्यात आली आहे.