राज्यात आरोग्याच्या कायमस्वरूपी सोयीसुविधा उपलब्ध करून देणार त्याचबरोबर नागरिकांमध्ये आरोग्याविषयी अधिक जनजागृती व्हावी म्हणून यासाठी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” ही मोहीम प्रभावीपणे राबवली जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या सभागृहात बोलून दाखविले.
जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना संकट लवकर जाणार नाही असा इशारा सर्व जगाला दिला आहे. त्यामुळे यापुढेही अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे. त्याचाच भाग म्हणून दोन टप्प्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर आणि १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर असे मोहिमेचे दोन टप्पे असणार आहेत.
यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्य विषयक चौकशी केली जाणार आहे. यात दोन कर्मचाऱ्यांचे स्वयंसेवकांचे एक पथक असेल. हे पथक एका दिवसात ५० घरांना भेटी देईल. सर्वांच्या सहभागाने ही एक राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येणार असून सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन कोरोनाशी दोन हात करण्याचे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे.