मुख्यमंत्री ठाकरे यांच्या फार्महाऊसवर अज्ञान व्यक्तीची संशयास्पद विचारपूस…
मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांचे खालापूर तालुक्यातील भिलवडी गावाच्या हद्दीत असलेले ठाकरे फार्महाउस बद्दल संशयास्पद विचारपूस करणाऱ्या व्यक्तींना खालापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनुज कुमार, यशपाल सिंग, प्रदीप धनावडे अशी ताब्यात घेण्यात येणाऱ्या संशयित व्यक्तींची नावे आहे. या सर्वांची रायगड पोलीस कसून चौकशी करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भिलवडी गावाच्या हद्दीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ठाकरे फार्महाउस आहे. काल रात्री चारचाकी गाडीतून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तीने स्थानिक गावकऱ्याला ठाकरे फार्महाउस बद्दल विचारणा केली. त्यानंतर रात्री गस्त घालत असलेल्या सुरक्षारक्षकाला ठाकरे फार्महाउस कुठे आहे असेही विचारणा त्या अनोळखी व्यक्तींनी केली.
मात्र त्याने माहिती देण्याबद्दल टाळाटाळ करताच सदर व्यक्तीला शिव्या घालून पुढेच ते मुंबईच्या दिशने निघून गेले. सदर सुरक्षरक्षकाने गाडी नंबर मुंबई पोलिसांना कळवळा. त्यानंतर त्या गाडीला खालापूर टोलनाक्यावर पकडण्यात आले असून, कसून चौकशी करण्यात येत आहे.