आयुक्त तुकाराम मुंडे समर्थनात नागपूरची जनता रस्त्यावर.
आयुक्त तुकाराम मुंडे यांची नागपूर महानगर पालिकेतून आयुक्त पदावरून बदली करण्यात आली. या बदलीनंतर त्यांचे अनेक चाहते त्यांना भेटण्यासाठी पोहचले होते. आज कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंडे यांनी नागपूरकरांचा निरोप घेतला. “काही गोष्टी करता आल्या. काही करायच्या होत्या. पण त्यात बदली झाली.
मी नियमानुसार माझ्या मार्गाने निघालो आहे. आपल्यातील ऋणानुबंध असेच कायम ठेवा”, अशी भावुक पोस्ट त्यांनी फेसबूकवरून केली आहे.आज भल्यासकाळी तपस्या या शासकीय निवासस्थानाबाहेर मुंडेंच्या समर्थनात नागरिकांनी मोठी गर्दी केली. विशेष म्हणजे नागपूर शहराला वाचवा असे फलक देखील अनेकांच्या हाती बघायला मिळाले.