मी विधानसभेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मला त्यांच्या अँटिचेंबरमध्ये बोलावले होते. त्यावेळी त्यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती. त्यावेळी मला काही राज्यपालपदाची इच्छा नाही असं मी त्यांना सांगितले.
तेव्हा मुलीची शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला राज्यपाल करणार आहोत आणि पक्षश्रेष्ठीची त्याला संमती असल्याचे फडणवीसांनी म्हटलं होते असे खडसे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खडसे यांनी हा गौप्यस्फोट केला.
राज्यपाल पद मिळाले नाही. त्यानंतर फडणवीस यांनी मला पुन्हा राज्यसभेत पाठवणार असल्याचं सांगितलं. राज्यातून राज्यसभेसाठी कुणीही जाणार नाही. फक्त तुमचंच नाव पाठवणार आहोत आणि तुमचं नाव पाठवण्यास पक्षश्रेष्ठींची काहीच हरकत नसल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं होतं. पण नंतर चार दुसरीच नावं आली, असंही त्यांनी सांगितलं.
माझ्याकडे काही पुरावे आणि फोटोग्राफ्स आहेत. ही माहिती उघड केली तर धक्का जरूर बसेल, असा दावाही त्यांनी केला. त्यामुळे खडसेंकडे कोणते पुरावे आहेत? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे.