Skip to content Skip to footer

महापौरांचे सोमय्यांना खुले आवाहन, फ्लॅट हडप केल्याचे सिद्ध करा शिक्षा भोगेन

लोअर परळ येथील एका सोसायटीतील फ्लॅट हडप केल्याचा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर लगावला होता. हे आरोप आता पेडणेकर यांनी फेटाळून लावले आहेत. सोमय्या यांनी आरोप सिद्ध करावेत. पाहिजे ती शिक्षा भोगेन. बिनबुडाचे आरोप करू नये, असे आवाहन महापौरांनी दिले आहे.

महापौर पेडणेकर यांनी परळच्या गोमाता नगर मध्ये इमारत क्रमांक-२ मधील ६०१ क्रमांकाचा फ्लॅट हडप केळ्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. या फ्लॅटमध्ये महापौरांनी त्यांचं कार्यालय थाटले होते आणि त्याबाबतची माहिती त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली होती, असा दावा करतानाच सोमय्या यांनी महापौरांचं शपथपत्रंच जाहीर केले आहे.

पेडणेकर यांनी सोमय्या यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपने हवेत आरोप करू नये. त्यांनी आरोप सिद्ध करावेत. हवी ती शिक्षा भोगेन, असं आव्हानच महापौर पेडणेकर यांनी केलं. तर मी फ्लॅट लाटला हे सिद्ध करा. चुकीचे आरोप करू नका. एका महिलेवर आरोप करताना लाज वाटत नाही का?, असा संतापही महापौरांनी व्यक्त केला.

Leave a comment

0.0/5