कांदिवली समता नगर येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स मध्ये राहणारे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी काल मारझोड केली तसेच या प्रकरणात स्थानिक शाखाप्रमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली तसेच त्यांचा जमीन सुद्धा मजूर करण्यात आला.
या मारहाणीच्या घडलेल्या संपूर्ण प्रकाराला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रयत्यक्षरित्या पाठिंबा दिला आहे. मुंबईत काल एका माजी नौदल अधिकाऱ्यावर हल्ला झाला. त्या अधिकाऱ्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत प्रसारित केलेले व्यंगचित्र बदनामीकारक असले तरी त्याच्यावर झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची संतप्त आणि तितकीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती असे गटांनी बोलून दाखविले.
पुढे बोलताना त्यांनी हे कायद्याचे राज्य, कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही. हल्लेखोरांवर कारवाई केलीय. राजकीय भांडवल करू नये असा सल्ला विरोधी पक्षाला अर्थात भाजपाला दिला आहे.