Skip to content Skip to footer

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राहुल गांधी यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७० वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्यावर जगभरातून चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह नेत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

तर मोदी यांचे पक्के विरोधक असेलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला आहे. त्यांच्यासोबत अनेक केंद्रीय मंत्री, नेते आणि मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, भाजपाने मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात ‘सेवा सप्ताह’ आयोजन केले आहे.

तर नेपाळचे पंतप्रधान के. पी शर्मा यांनी सुद्धा मोदींना वाद्यविसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, मी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करतो. दोन्ही देशांच्या संबंधांना अधिक मजबूत करण्यासाठी मिळून काम करुयात. असे म्हंटल आहे.

Leave a comment

0.0/5