राज्यात पोलिसांच्या मेगा भरतीची मनुरी ठाकरे सरकारने दिली आहे. यासाठी सर्व स्थरातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानण्यात येत आहे. लवकरच राज्यात पोलीस शिपाई संवर्गातील उपरोक्त पदे भरण्याची कार्यवाही केली जाईल अशी महती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेली आहे.
पोलीस शिपाई संवर्गातील २०१९ या वर्षामधील ५२९७ पदे तसेच २०२० या वर्षामधील ६७२६ पदे व मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्यातील नवनिर्मित ९७५ पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील ५०५ अशी एकूण १२ हजार ५२८ पदे १०० टक्के भरण्यात येतील अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.