शिवसेना आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रनौत यांच्यातील वाद उफाळलेले असताना शिवेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांना अयोध्येत आल्यावर विरोध करू असे अयोध्येतील संतांनी म्हटलं होतं. मात्र श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय हे ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.
कुणाच्या आईनं त्याला इतकं दूध पाजलंय की तो उद्धव ठाकरेंचा सामना करेल आणि तेदेखील अयोध्येत… कुणाच्या आईनं इतके जिरे खावून इतक्या शक्तीशाली मुलाला जन्म दिलाय की तो गंगेला रोखू शकेल, असं म्हणत चंपत राय यांनी ठाकरेंना अयोध्यते येण्यासाठी विरोध करणाऱ्यांना आव्हान दिलं आहे.
पुढे बोलताना त्यांनी अयोध्येत असं कोण आहे, ज्याच्या आईनं इतके जिरे खाल्यानं अशा संतानानं जन्म घेतलाय की तो अयोध्येत उद्धव ठाकरेंना येण्यापासून रोखू शकेल, असंही चंपत राय यांनी म्हटले आहे.