कोरोनाच्या संकटात अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या की नाही यावर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने परीक्षा घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता परीक्षांच्या तारखा आणि त्याचे स्वरूप या संदर्भात विध्यार्थ्यांना माहिती देण्यात आलेली आहे. मात्र पदवी प्रमाणापत्रावर कोविड-१९ चा शिक्का असणार आहे का?, हा प्रश्न सर्व विद्यार्थांना होता. यावर राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत स्पष्टीकरण दिलं आहे.
पदवी प्रमाणपत्रावर कोविड-१९ चा उल्लेख असण्याबाबतचा जो कोणी चुकीचा संदेश पसरवत आहे किंवा जे कोणी तसा संदेश पसरवतील त्यावर पोलीस कारवाई करणार असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली आहे. दरम्यान, ५० मार्कांची परीक्षा होणार असून ९० टक्के ऑनलाईन परीक्षा देणार आहेत. मागील वर्षांचे मार्क्स गृहीत धरण्यात येणार आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्यांची डिसेंबरमध्ये त्यांची परीक्षा घेण्यात येणार असल्याचंही सामंत यांनी सागितलं आहे.