Skip to content Skip to footer

खोटी आकडेवारी माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांस मान्य आहे का…??

मुख्यमंत्री सहाय्यता निधी तर्फे राज्यातील गरजू आणि गरीब कुटुंबातील जनतेला उपचारासाठी निधी मार्फत मदत करण्यात येत असते. ह्या संकल्पनेचे मूळ निर्माते मंगेश चिवटे असून मागील अनेक काळापासून ते वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. मात्र आता त्यांनी स्वतः तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा पुराव्यानिशी उघडीस आणला आहे.

फडणवीसांच्या कार्यकाळात एकूण २१ लाख लोकांना, १५०० कोटी पर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत झाल्याचे फडणवीस सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र माजी मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आकडेवारी साफ चुकीची आहे याचा खुलासा खुद्द सहाय्यता निधीच्या मूळ संकल्पनेचे निर्माते मंगेश चिवटे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर संपूर्ण माहितीचा लेखाजोखा तपशिलासह प्रसिद्ध केला आहे.

माज़ी मुख्यमंत्र्यांच्या काळात २१ लाख नाही तर फक्त ५४ हजार लोकांना १५०० कोटी नाही तर ५२६ कोटीची मदत केल्याची माहिती त्यांनी पुराव्यानिशी सादर केली आहे. २०१४-१९ काळात एकूण वैद्यकीय मदतीसाठी ८६,६८९ अर्ज आले त्यातले फक्त ५३,७६२ अर्ज मान्य करण्यात आले असून एकूण झालेली मदत ही ५२६ कोटी इतकी आहे. अशी माहिती चिवटे यांनी दिलेली आहे.

(मंगेश चिवटे यांनी मांडलेली माहिती )
माजी मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांच्या कार्यकाळात 21 लाख रुग्णांना 1500 कोटींची मदत केल्याचा दावा केला जातोय.
Fact Check.
प्रत्यक्षात
21 लाख रुग्णांना नव्हे तर 54 हजार रुग्णांना केली गेली मदत
1500 कोटी नव्हे तर 526 कोटींची केली गेली मदत
5 वर्षांत एकूण मदतीसाठी आलेले एकूण अर्ज – 86,689
5 वर्षात एकूण मदत मान्य केलेले अर्ज – 53,762
5 वर्षांत एकूण झालेली मदत – 526 कोटी रुपये
राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब गोरगरीब रुग्णांप्रति संवेदनशील होते का..?? तर नक्कीच होते…म्हणूनच त्यांनी माझ्या सुमारे 4 महिन्याच्या पाठपुराव्यानंतर तात्काळ मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करण्यास मान्यता दिली होती..( यासाठी नोव्हेंबर 2014 ते फेब्रुवारी 2015 असा सातत्याने पाठपुरावा केला होता.याकामी मला श्री फडणवीस साहेब यांचे तत्कालीन सहकारी श्री परिणय फुके आणि स्विय सहाय्यक श्री सुमित वानखेडे यांनी प्रामाणिक मदत करत वेळोवेळी श्री फडणवीस साहेब यांच्या भेटी घडवून आणल्या..)
तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात तब्बल गरजू 21 लाख रुग्णांना 1500 कोटी रुपये मदत वितरित केली गेली असल्याची खोटी माहिती नाटकीय पद्धतीने रडत रडत सांगितली जात आहे…हा अभिनय पाहून साक्षात अलका कुबल देखील लाजल्या असतील…कारण त्यांच्यापेक्षाही सुंदर रडण्याचा अभिनय ही व्यक्ती करत आहे..
असो, मी याठिकाणी देत असलेली माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या, वेबसाईटवर आहे…कोणीही अभ्यासू नागरिक / पत्रकार याची खात्री करू शकेल…
जाता जाता –
21 लाख रुग्णांना 5 वर्षात मदत म्हणजे
सरासरी 1 वर्षात 4 लाख 20 हजार रुग्णांना मदत
1 वर्षात शासकीय कामकाजाचे दिवस 300 दिवस गृहीत धरले तर 1 महिन्याला 42 हजार रुग्णांना मदत केली गेली आहे…
एकूण 5 वर्षात सुमारे 54 हजार रुग्णांना मदत केली गेली असल्याचे आकडेवारी पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते…म्हणजे 2 दिवसांतच 5 वर्षांचा कार्यकाळ या ठिकणी पूर्ण केलाय…
झूठ बोले , कौआ काटे…
ता. क.
आदरणीय रवी सर,
आपण परवाच सांगितले होते…पुराव्यानिशी शाबीत करा…
शक्ती पेक्षा , युक्ती मोठी…
आपलाच,
देवदूत नव्हे तर विनम्र रुगसेवक,
मंगेश नरसिंह चिवटे,
मूळ संकल्पना – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष.
मूळ संकल्पना तथा कक्ष प्रमुख – शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष.
मा ना श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्यकाळात सुमारे 21 लाख रुग्णांना तब्बल 1500 कोटी रुपयांची मदत केल्याचा दावा केला …मात्र Fact Check केली असता फक्त 54 हजार रुग्णांना सुमारे 526 कोटींची मदत केली गेली आहे….
आजही, आताही मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या वेबसाईटवर ही आकडेवारी उपलब्ध आहे…
माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांस ही खोटी आकडेवारी मान्य आहे का….???

Leave a comment

0.0/5