शेतकऱ्यांच्या आंदोलनावर नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटला उत्तर देताना कंगना रानौत हिने शेतकऱ्यांचा दहशतवादी असा उल्लेख करत एका नवा वाद अंगावर ओढावून घेतला होता. यावर कंगनावर अनेक लोक तुटून पडले आहेत.
मात्र आपण शेतकऱ्यांना आतंगवादी म्हटलेलं नाही, तसं सिद्ध झाले तर मी ट्वीटर सोडून देईन असे ट्वीट कंगना रानौतने केलं होते. मात्र खुलाश्याचं ट्वीट करत असतानाही कंगना राणावत ने श्रीकृष्णाच्या नारायणी सेनेचा उल्लेख केलेला ही नेटकऱ्यांना आवडलेला नाही.
जशी श्रीकृ्णाची नारायणी सेना होती तशी पप्पूची ही आपली एक चंपू सेना आहे, जी फक्त अफवा पसरवण्याचं काम करते असे कंगनाने म्हंटले होते. मात्र या खुलाश्यामुळे ती जास्तच ट्रोल झालीय. Arrest_Casteist_Kangna असा ट्वीटर ट्रेंड सध्या ट्वीटर वर नंबर एक वर सुरू आहे. शेतकऱ्यांना अतिरेकी म्हणणाऱ्या कंगनाला अटक का नाही असा सवाल नेटकरी विचारत आहेत..