Skip to content Skip to footer

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांना श्रद्धांजली

कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर, ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांच्या निधनामुळे एक सच्चा कार्यकर्ता, मनमिळावू लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, राजेंद्र देवळेकर यांचे निधन मनाला चटका लावणारे आहे. धडाडीचे शिवसैनिक अशी ओळख असणारे देवळेकर या कोरोना काळातही अनेकांच्या मदतीला धावून गेले होते.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विकास वाटचालीत त्यांचा निश्र्चितच मोठा वाटा आहे. त्यांच्या निधनामुळे एक सच्चा कार्यकर्ता, मनमिळावू लोकप्रतिनिधी गमावला आहे. ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave a comment

0.0/5