‘कंगना जर ड्रग्जचे सेवन करत असेल तर तिची देखील चौकशी व्हावी, अशी मागणी आता चक्क भाजपा नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. त्यामुळे अनेकांच्या भोवला उंचावल्या आहेत. ते आज पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपा कंगना प्रकरणात दूहेरी भूमिका तर घेत नाही ना? असा प्रश्न त्यांच्या या वक्तव्यामुळे निर्माण होत आहे.
‘ड्रग्ज प्रकरणात जो न्याय इतरांना तोच न्याय कंगानाला. कंगना रानौत काही देशाची वेगळी नागरिक नाहीये. कायदा सर्वांनाचा सारखा. कुणीही कोणाला पाठीशी घालण्याची गरज नाही’, असे प्रवीण दरेकर यांनी पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलून दाखविले.
सुशांतसिह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआयने तपास सुरु केल्यावर बॉलीवूड मध्ये सुरु असलेले ड्रग्स प्रकरण नार्कोटिक्स डिपार्टमेंटने समोर आणले होते. त्यात अभिनेत्री कंगना रानौत हिने बॉलीवूड मध्ये सुरु असलेल्या ड्रग्ज पार्ट्यांवर बोलने सुरु केले. त्यात दीपिका पदुकोण, सारा अली खान या बॉलीवूड अभिनेत्रीची नावे पुढे आली होती. त्यातच आता भाजपाने कंगनाची सुद्धा चौकशीची मागणी करून कंगनाला धक्काचं दिला आहे.