मागील अनेक दिवसांपासून सुशांतसिह राजपूत आत्महत्या प्रकरणी खासदार नारायण राणे आणि त्यांचे दोन सुपुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना पक्षावर जोरदार टीका करत आहे. त्यात नाणार प्रकल्पातील जमीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मावस भावाने घेतल्याचा आरोप राणे यांनी लगावला होता. आता त्यांच्या या आरोपाला खासदार विनायक राऊत यांनी टीका केली आहे.
भाजपा नेते निलेश राणे भाजपाचे आउटडेटेड झालेले नेते आहेत. आज तर त्यांनी एक मोठा जावई शोध लावला आहे. अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. निलेश राणेंच्या वक्तव्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही ते अभ्यास करून बोलत नाहीत, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.