Skip to content Skip to footer

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची, ट्विटकरून दिली माहिती

राज्याचे नगर विकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची झाल्याचे समोर आहे. याबाबतची माहिती खुद्द मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटरवरून दिलेली आहे. मागील अनेक दिवसांपासून शिंदे हे स्वतः पीपीई किट घालून कोविड रुग्नालयात कोरोना रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची विचारपूस करताना दिसून आले होते.

याबाबत आज ट्विट करून मंत्री शिंदे यांनी माहिती दिली आहे. ” “मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी” असे ट्विट त्यांनी केले आहे.

दरम्यान त्यांच्या या ट्विटनंतर मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार अजय चौधरी णि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनीही शिंदे यांना बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a comment

0.0/5