रत्नागिरी जिल्हा परिषद राष्ट्रीय पेयजल सन २०१९–२० अंतर्गत शिरखल दगडवणे व चिंचाळी गाव, ता. दापोली या दोन गावात नळपाणी पुरवठा योजनेचा भूमिपुजन सोहळा खेड दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांच्या हस्ते पार पडले. या योजनेमुळे पाणी टंचाई असलेला हा दोन गावांचा भाग पाणी टंचाई मुक्त होणार आहे असा विश्वास आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे.
या गावांतील पाणी समस्या संपवण्यासाठी पाठपुरावा केला असून, दोन्ही कामांसाठी एकूण ३७ लाख ४० हजार रुपये इतका निधी खर्च केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गावागावात नळ जोडणीद्वारे नागरिकांना पाणी पुरवण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद राष्ट्रीय पेयजल सन २०१९–२० योजना राबवण्यात येत आहे. या नळपाणी पुरवठा योजने अंतर्गत होणाऱ्या कामांचे भूमिपुजन ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. या उपक्रमाद्वारे या गावाची २५ वर्ष जुनी असलेली पाणी पुरवठा करणारी यंत्रणा दुरुस्त होऊन घरोघरी नागरिकांना पाणी मिळणार आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना तालुका संघटक श्री. उन्मेष राजे, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका सौ. रोहिणी दळवी, तालुका संघटिका सौ. दीप्ती निखार्गे, माजी जि. प. सदस्य श्री. राजेंद्र फणसे, श्री. सुनील दळवी, श्री. संतोष चव्हाण, श्री. अनंत वाजे तसेच शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित हो