Skip to content Skip to footer

‘३७०’ कलम हटवल्यानंतर केंद्राने ‘कश्मिरात’ ‘फिल्मसिटी’ची योजना राबवावी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतेच आपल्या राज्यात फिल्मसिटी उभारण्याची घोषणा केली. ही फिल्म सिटी गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील ग्रेटर नोएडामध्ये बनवण्यात येणार आहे. सध्याच्या स्थितीत देशाला एका चांगल्या फिल्मसिटीची गरज असल्याचे योगीजींनी बोलून दाखविले होते. आणि याच मुद्द्यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामानातून योगी आदित्यनाथ यांच्यासह केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे.

लॉकडाऊनमुळे चित्रीकरण व चित्रपटांचे प्रदर्शन बंद असताना योगीजींनी नव्या ‘फिल्मसिटी’ची संकल्पना मांडली आहे. अर्थात मुंबईच्या चित्रनगरीचे महत्त्व हे कायमच राहील. खरं तर ‘३७०’ कलम हटवल्यानंतर केंद्राने ‘कश्मिरात’ अशा एखाद्या ‘फिल्मसिटी’ची योजना राबवायला हवी. एकेकाळी आमच्या सिनेजगतास चित्रीकरणासाठी कश्मीर, सिमला, मनाली, शिलाँग अशा भागांची भुरळ पडली होती. ‘रोमॅण्टिक’ गाण्यांसाठी कश्मीर हे आवडते ठिकाण होते. तेथेही भव्य ‘फिल्मसिटी’ उभारता येईलच. शेवटी प्रत्येकाने हिंदुस्थानी सिनेसृष्टीत आपले योगदान दिलेच आहे.

दादासाहेब फाळके व महाराष्ट्राने सिनेसृष्टीत सगळ्यांना सामावून घेतले. हा उद्योग मोठा केला. त्यावर आता चिखलफेक सुरू आहे. पण इतर राज्येही मुंबईप्रमाणे सिनेउद्योगास चालना देणार असतील तर त्यांना शुभेच्छा!, अशी खोचक टीका शिवसेनेनं योगी आदित्यनाथ यांच्यावर केली आहे.

Leave a comment

0.0/5