Skip to content Skip to footer

ठाण्यात शिवसेना नगरसेवकाच्या मुलाची गोळ्या घालून हत्या !

 

नगरसेवक माणिक पाटील यांचा मुलगा राकेश पाटील याची मालमत्तेच्या वादातून गोळ्या झाडून हत्या झाली आहे. सदर घटना बुधवारी घडलेली असून राकेशचा सावत्र भाऊ सचिन पाटील आणि नगरसेवक माणिक पाटील यांचा वाहन चालक गौरव सिंह या दोघांनी मिळून राकेश याचा खून केला आहे. या प्रकरणी दोघांवर कासारवडवली पोलिस स्थानकामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ठाणे येथे नगरसेवक पाटील यांचा बंगला आहे. पाटील यांच्या पत्नी काही दिवसापासून एका खाजगी रुग्नालयात उपचार घेत होत्या. चार दिवसापुर्वी त्या घरी आल्यावर घरातील तिजोरी फोडल्याचे त्यांच्या निर्देशनास आले. तसेच त्यांचा मुलगा राकेश सुद्धा घरी नसल्याचे त्यांच्या निर्देशनास आले. राकेश बेपत्ता असल्याची तक्रार नगरसेवक पाटील यांनी कासारवडवली पोलीस स्थानकात दिली होती.

या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता राकेश याचा खुन झाल्याचे तपासातून समोर आले होते. सदर खून गौरव सिंह याने केला असून, सापळा रचून पोलिसांनी त्यांना अहमदनगर येथून अटक केले. त्याची कसून चौकशी केली असता बंगल्याची वाटणी आणि मालमत्तेसाठी सचिनने राकेशच्या हत्येचा कट रचला असल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या पोलीस सचिनचा शोध घेत आहे.

Leave a comment

0.0/5