राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी कृषी विधेयकावर हस्ताक्षर करून त्याला अंतिम कायदयाचे स्वरूप दिले आहे. याच पाश्वभूमीवर कृषी विधेयकाविरोधात विरोधी पक्ष आणि काँग्रेस आक्रमक झालेली असून अनेक राज्यात विधेयका विरोधात असंतोष निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी गाड्यांच्या जाळपोच करण्यात आलेली आहे. त्यातच आता शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या कन्या आकांक्षा चौगुले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.
या पत्रात आकांक्षा चौघुले यांनी लिहिले आहे की, केंद्र सरकारची धोरणे अशीच सुरु राहिली तर २०२२ पर्यंत ‘शेतकरी उत्पन्न’ दुप्पट होण्याऐवजी ‘शेतकरी आत्महत्या’ दुप्पट होतील, असा इशारा आकांक्षा चौगुले यांनी दिला आहे. दरम्यान, तुम्ही म्हणता माल विकायला बाहेर जा पण आमचा पोशाख बघून आमची किंमत ठरवणारी ही भांडवलशाही व्यवस्था आम्ही सांगू त्या किमतीला माल घेईल का?, असा सवालही आकांशा चौघुले यांनी पत्रातून उपस्थित केला आहे.