शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शरद पवारांनी केंद्र सरकारसोबत यावे. पवार सोबत आल्यास राष्ट्रवादीला सत्तेतही वाटा मिळेल तसेच पंतप्रधान मोदीं यांना शरद पवारांच्या रूपाने चांगला मित्र मिळेल असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार माध्यमांसमोर केले होते. आता आठवले यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादींचे चांगलाच समाचार घेतला आहे.
कधी कधी काही माणस जास्तच बोलतात, नुसती कविता करण्यात व्यस्त असतात. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे एक आहेत. असा टोला राष्ट्रवादीचे महेश तपासे यांनी आठवले यांना मारला आहे.
पुढे बोलताना तपासे म्हणाले की, माणस, ज्या वर्गाच्या हिताचे संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारने दिली त्याला बगल देऊन नुसती कविता करण्यात व्यस्त असतात. फुकटची प्रसिद्धी कशी मिळेल, मग ते कारण काहीही असो त्याच प्रयत्नात असतात. मोदी सरकार हळूहळू सर्व सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करत असताना त्या कंपनीतील उपेक्षित वर्गाच्या कामगार, कर्मचारी यांच्या हिताच्या संरक्षणासाठी आपले मंत्रालय काय करत आहे? असा प्रश्न त्यांनी आठवले यांना विचारला आहे.