Skip to content Skip to footer

लता दीदींच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत संगीत विदयालय सुरु करणार- उदय सामंत

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथे ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय’ सुरू करण्यात येणार अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. लतादीदींना वाढदिवसानिमित्त भेट म्हणून हा निर्णय घेतला आहे. त्यांनाही हा निर्णय नक्कीच आवडेल. या संगीत महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातील कलाकार येत्या काळात तयार होतील, असे सांगून उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून या महाविद्यालयाची निर्मिती होईल. नव्या पिढीचे गायक, संगीतकार निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे देशातलं पहिलं संगीत महाविद्यालय लवकरच मुंबईत सुरू करण्यात येणार आहे. मंगेशकर कुटुंबीयांचा संगीत क्षेत्रात असलेला वारसा पुढे नेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गायक, वादक आणि संगीत क्षेत्रात काम करू इच्छिणारे कलाकार तयार होतील, असा विश्वास ना. सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a comment

0.0/5