Skip to content Skip to footer

तीन-चार दिवसात मोठी बातमी देऊ – एकनाथ खडसे

खडसे यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी वक्त्यव्य केले आहे. सध्या फिरत असलेला तो व्हिडिओ क्लीपचा विषय जुना असून येत्या तीन-चार दिवसात लवकरच आपण मोठी बातमी देऊन असे वक्त्यव्य खडसे यांनी केले आहे. भाजपाच्या ऑनलाइन बैठकीत सहभागी झाल्यानंतर पत्रकारांशी चर्चा करताना हे विधान केले. त्यामुळे त्यांच्या पक्षांतरणाबाबत आणखीनच संभ्रम निर्माण झाला आहे.

पक्षातील विविध आघाड्यांवर सातत्याने डावलले जात असल्याने माजी मंत्री एकनाथ खडसे हे नाराज असून याविषयी त्यांनी अनेक वेळा उघड भाष्य केले आहे. त्यानंतर मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी महिनाभरात आपण निर्णय घेणार असून दुसऱ्या पक्षात केवळ काय पद मिळते याची प्रतीक्षा आहे, असा संवाद असलेली ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती.

खडसे यांची ऑडिओ क्लीप व्हायरल होताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपची ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत एकनाथ खडसे हे आपल्या जळगावात येथील निवासस्थानातून सहभागी झाले होते.

दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना डावलल्यामुळे आता ते लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत होती. खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाबाबत आता जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने खडसे यांना पक्षात घेण्यासाठी काही अटी टाकल्याची चर्चा होती

Leave a comment

0.0/5