Skip to content Skip to footer

भाजपच्या आक्रमक वृत्तीला ‘आरे ला कारे’ म्हणणाऱ्या शिवसेनेच्या प्रभावी नगरसेवकांची गरज

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात शिवसेना पक्षाने राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी स्थापन करून राज्यात तीन पक्षाची सत्ता स्थापन केली त्यामुळे २५ वर्ष जुना मित्रपक्ष असलेला भाजपा आता मुंबईत महानगर पालिकेवर सत्ता असलेल्या शिवसेना पक्षाला अडचणीत आणण्याचे काम करताना दिसत आहे.

त्यात महानगर पालिकेत भाजपा आक्रमक होताना सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सुद्धा आक्रमक होण्याची गरज आहे. त्यामुळे महापालिका सभागृहासह प्रत्येक समित्यांमध्ये भाजच्याच्या ‘आरे’ला ‘कारे’ म्हणण्याची ताकद असणाऱ्या अनुभवी सदस्यांची वर्णी लावणे आवश्यक आहे. मात्र, शिवसेना अनुभवी सदस्यांऐवजी नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांवरच अधिक विश्वास टाकताना दिसत आहे.

मुंबई महापालिकेत सहा वेळा नगरसेवक बनलेल्या आणि माजी महापौर श्रध्दा जाधव यांच्यासह प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, आशिष चेंबूरकर, मंगेश सातमकर, रमाकांत रहाटे, राजुल पटेल, राजू पेडणेकर, शुभदा गुढेकर, सुवर्णा करंजे, बाळा नर, माजी महापौर मिलिंद वैद्य यांच्यासह दोन ते तीन वेळा नगरसेवक बनलेल्या विश्वनाथ सदानंद परब, शीतल म्हात्रे, सुजाता पाटेकर, यांच्यासह नवीन अमेय घोले, सचिन पडवळ, समाधान सरवणकर, वसंत नकाशे, उर्मिला पांचाळ, अनिल कोकीळ, दत्ता पोंगडे आदी अभ्यास करून सभेत तसेच समित्यांच्या बैठकीत बोलणारे आहेत. यासर्वांची टिम बनवल्यास भाजपचे आक्रमण थोपवणे शिवसेनेला सोपे जाणार आहे.

Leave a comment

0.0/5