Skip to content Skip to footer

हाथरस प्रकरणी शिवसेना पक्षाने दिले राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांना पत्र

उत्तरप्रदेश हाथरस येथे एका दलित मुलीवर झालेल्या बत्कारप्रकारणी संपूर्ण देशभरात राजकारण चांगलेच तापलेले आहे. त्यात बलात्कार करून तिची जीभ कापण्याचा आणि मान मोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यात उत्तरप्रदेश पोलिसांनी रातोरात मृतदेह तिच्या गावी आणून कुटुंब आणि समाजाच्या झुगारून संशयास्पद तिच्यावर रात्रीच्या-रात्री अंत्यसंस्कार केले त्यामुळे उत्तरप्रदेश आणि स्थानिक पोलिसांच्या वर्तुणुकीवर संशय निर्माण होत आहे. यावर आता शिवसेना प्रवक्त्या आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांनी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना याप्रकरणामध्ये दोषींना कठोर शासन करण्यात यावं अशी मागणी करणारं पत्र पाठवलं आहे.

उत्तर प्रदेशमधील हाथरसमधील १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची बातमी वाचून खूप दु:ख झालं. १४ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेमध्ये तिचा गळा आवळण्यात आल्याचे तिला गंभीर जखमा झाल्या आणि २९ सप्टेंबर २०२० रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पीडितेचा मृतदेह तिच्या नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आला नाही. पोलिसांनीच परसपसर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. यामुळे भारतीय लोकांमध्ये चुकीचा संदेश गेला आहे, असं गोऱ्हे यांनी या पत्रामध्ये नमूद केलं आहे.

Leave a comment

0.0/5