लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर अनेक मतबल नेत्यांनी राष्ट्रवादी पक्षाला राम-राम करत इतर पक्षात जाहीर प्रवेश केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीला राष्ट्रवादी पक्षाने जोरदार मुसंडी मारत सरळ-सरळ सत्ता स्थापन करण्यात आपला सहभाग नोंदवला होता. या झालेल्या सत्ता पालटानंतर सोडून गेलेले अनेक नेत्यांनी पुन्हा एकदा घरवापसी करत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील रमेश कदम तसेच भाजपातून आलेले उस्मान मोमीन, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शशिकांत मोकल व उषा चौधरी यांनी प्रदेशाध्यक्ष जात्यांत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला तर काहीच दिवसांपूर्वी सहकार क्षेत्रातील दिग्ग्ज नेते तसेच माजी आमदार सीताराम घनदाट यांनी पक्षात प्रवेश केला होता.
यावर बोलताना पाटील म्हणाले की, पक्ष बळकट करण्यासाठी आपले चौफेर प्रयत्न सुरू आहेत. आदरणीय खासदार पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची अनेकांची इच्छा आहे. पक्ष सोडून गेलेल्यांनीही घरवापसीची इच्छा प्रकट केलीय. त्यामुळे सर्व चांगल्या प्रवृत्तीचे लोक पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत असे बोलून दाखविले.