बिहार राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहे आहे. सध्या बिहारमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. त्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणुकीचा प्रभारी केल्यामुळे बिहारबरोबर महाराष्ट्रातही या निवडणुकीला अधिक रंग चढणार आहे.
याच पाश्वभूमीवर बिहारमध्ये शिवसेना पक्षातर्फे जागा लढवण्यात याव्या अशी मागणी स्थानिक शिवसेना पक्षाचे बिहार मधील नेते करत आहे. बिहारचे शिवसेना प्रमुख हौसलेंद्र शर्मा मुंबईत येऊन संजय राऊत यांची भेट घेतली व शिवसेनेने बिहार निवडणुकीत सहभाग घ्यावा व ५० पेक्षा जास्त जागा लढवाव्या अशी विनंती बिहार शिवसैनिकाने राऊत यांच्याकडे केली आहे. मात्र या संदर्भात अंतिम निर्णय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे घेतील असे राऊत यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
भूमिपुत्रांचा विकास आणि प्रखर राष्ट्रवाद हे मुद्दे घेऊन शिवसेनेची स्थापना झाली होती त्याच मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाईल.आमचे भूमिपुत्र रोजगारासाठी कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत गेलेले आहेत. बिहार शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन 50+ जागा लढवण्याची आग्रही मागणी केलीय. ती घेऊन आम्ही मुंबईत आलो आहोत.असे बिहारचे शिवसेना प्रमुख हौसलेंद्र शर्मा यांच्याकडून सांगण्यात आले आहे