मंत्रालयाच्या दालनात ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत अधिकारी यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी ग्रामविकासा मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना आणि त्यांच्या कामाला गती द्यावी असे आदेश अब्दुल सत्तार यांनी संबंधित खात्यांच्या प्रसकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या बैठकीला ग्रामविभागाचे अतिरिक्त सचिव अरविंद कुमार, ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रवीण जैन, उपसचिव उदय जादव उपस्थित होते. यावेळी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत सुरु करण्यात येणारी कामे लवकरात लवकर सुरु करावी असे आदेश मंत्री सत्तार यांनी दिलेले आहेत.
ग्रामविकास विभागामार्फत कोकणातील ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी दिली जातो. अशीच योजना मराठवाड्यासाठी राबविता यावी. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अनेक ऐतिहासीक आणि पुरातन वास्तू, किल्ले, गुंफा, अभयारण्ये आदी पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे मराठवाड्यात पर्यटनाला चालना मिळेल असा मुद्दा यावेळी त्यांनी मंडल होता.
तसेच कृषी आणि ग्रामीण पर्यटनालाही मराठवाड्यात मोठा वाव आहे. यातून मराठवाड्याच्या पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची क्षमता निर्म होऊ शकते. त्यामुळे येत्या काळात ग्रामविकास विभागामार्फत कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाच्या धर्तीवर मराठवाडा ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम राबविण्यात येईल. यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना यावेळी मंत्री अब्दुल सत्तार आदेश दिले.