Skip to content Skip to footer

चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचे हाथरस प्रकरणी आंदोलन

हाथसार येथे एका दलित अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी आणि त्या घटनेनंतर उत्तर प्रदेश प्रशासनाच्या दबावाखाली पोलिसांनी संशयास्पदरीत्या केलेल्या अंत्यसंस्कारामुळे संपूर्ण देशभरात संतप्त वातावरण निर्माण झाले होते.
उत्तरप्रदेश सरकारच्या जंगलराज विरोधात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी चर्चगेट स्थानकात शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्तरप्रदेश सरकार विरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनात महिलांचा या आंदोलनात मोठा सहभाग दिसून आला होता.

यावर प्रतिक्रिया देताना खासदार सावंत म्हणाले की, घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे. जसे विकास दुबेला मारलं, की कोणत्याही परिस्थितीत सत्य बाहेर येऊ नये त्याच परिस्थितीत काळ्या अंधारात पीडितेच्या मृतदेहावर अंतसंस्कार करण्यात आले.

पुढे बोलताना खासदार सावंत म्हणाले की, हीच लोक जेव्हा आमच्या पालघरला जेव्हा साधूंच प्रकरण झालं तेव्हा लगेच राष्ट्रपती राजवटीची मागणी करत होते. कुठे गेले त्या टिनपाट साऱ्या नट्या, Y+ सुरक्षा घेणारे कुठे आहेत, कोण देणार गरिबांना सुरक्षा असे म्हणत कंगना रानौत आणि तिच्या समर्थांत उतरलेल्या भाजपा नेत्यांना सावंत यांनी टोला लगावला होता.

Leave a comment

0.0/5