Skip to content Skip to footer

हाथरस प्रकरणी भाजपा आमदाराचे वादग्रस्त विधान आई-भावाने केली मुलीची हत्या, ते चारही तरुण निर्दोष

हाथरस येथे एका दलित अल्पवयीन मुलीवर तेथील स्थानिक सवर्ण जातीच्या मुलांनी बलात्कार करून तिच्यावर अमानवीय कृत्य केले होते. याप्रकरणावरून संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली होती.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रशासनाने तर रात्रीच्या अंधारात उपचारा दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या त्या अल्पवयीन मुलीवर रात्रीच्या रात्री अंत्यसंसरकार करून प्रकरण दाबण्याचा प्रकार केलेला समोर आला होता. त्यात आता एका भाजपा आमदाराने अकलेचे तारे तोंडत सदर प्रकरणावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

हाथरसमध्ये सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेची तिच्या आई आणि भावाने हत्या केल्याचा दावा भाजपच्य माजी आमदाराने केला आहे. या प्रकरणात जातीवादावरून राजकारण केलं जात आहे. चारही युवक निर्दोष आहे. त्यांना फसवण्यात आलं आहे, असा दावा राजवीर सिंह पहेलवान यांनी केला आहे. असे वक्त्यव्य आमदाराने केले आहे.

Leave a comment

0.0/5