Skip to content Skip to footer

कोरोनाच्या संकटात महाराष्ट्राला केंद्राची तोकडी मदत

महाराष्ट्रात इतर राज्याच्या तुलनेत कोरोनाचा प्रभाव अधिक प्रमाणात पसरला आहे. त्यात केंद्राने कोरोनाच्या संकटात पीपीईकिट, एन ९५ मास्क, वेन्टिलेटर मशीन या सारख्या अत्यावश्यक असलेल्या वैद्यकीय सामग्री राज्याला पुरविणे बंद केले होते. तसेच या संदर्भात केंद्रीय आरोग्य खात्याला राज्य सरकारने वारंवार पत्र लिहून सिद्ध पुरवठा पुर्वव्रत करण्यात आला नव्हता. आज महाराष्ट्रात इतर राज्याच्या तुलनेत अधिक रुग्ण आढळून सुद्धा केंद्राकडून मिळालेली मदत तोकडी होती.

सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत केंद्राने एकूण ४,२५६.७९ कोटी रुपयांचा निधी देशासाठी दिला. त्यातील फक्त ९.२५ टक्के निधी म्हणजे ३९३.८२ कोटी रुपये हे महाराष्ट्राच्या वाट्याला आले आहेत. आज राज्यातून केंद्राला दिलासा जाणाऱ्या महसुलाचा विचार केला तर इतर राज्यापेक्षा महाराष्ट्र हा सर्वाधिक महसूल देणारे राज्य असून सुद्धा हा दुजाभाव का ? असा प्रश्न आज उपस्थित होत आहे.

केंद्राने एकूण ३४२.८३ लाख एन ९५ मास्क देशात वितरित केले. मात्र, महाराष्ट्राला २९.२६ लाख म्हणजे ८.५३ टक्के मास्क मिळाले. पीपीई किटच्या संदर्भातही रुग्णसंख्येच्या तुलनेमध्ये दुजाभाव करण्यात आला. महाराष्ट्राव्यतिरिक्त अन्य राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मिळून १३९.१६ लाख पीपीई देण्यात आले, तर राज्यात मात्र १२.५८ लाख पीपीईची उपलब्ध केले.

Leave a comment

0.0/5