आजपासून राज्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंटस् होणार सुरु
आजपासून राज्यातील हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंटस् पुन्हा सुरु होणार आहे. काही नियम आणि अटींसह राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंटस् आणि बार उघडण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिलेली आहे. ५० टक्के क्षमतेने, थर्मल स्क्रिनिंग, हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर यांसह काही नियम सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.
कोरोनाच्या संकटात मागील पाच ते सहा महिन्यांपासून राज्यातील सर्व हॉटेल्स संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून बंद ठेवण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी हॉटेल चालक आणि मालक संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हॉटेल्स सुरु करण्यासंदर्भात परवानगी मागण्यात आली होती. याच दिलेल्या निवेदनाचा विचार करून राज्य शासनाकडून हॉटेल्स सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
‘या’ नियमांचे पालन करणे गरजेचे
* सर्व ग्राहकांची थर्मल गनसारख्या उपकरणाद्वारे तपासणी करणे.
* सेवा देताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे.
* दोन टेबलांमध्ये किमान एक मीटरचे अतंर पाळावे.
* ग्राहकांनी मास्क परिधान करणे बंधनकारक.
* ग्राहकांसाठी हँड सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे आवश्यक.
* परिसराचे दिवसातून दोनवेळा सॅनिटायझेशन करणे गरजेचे.
* कर्मचाऱ्यांनी एन-95 किंवा याच दर्जाचा मास्क वापरणे गरचेचे.
* करमणुकीच्या लाईव्ह कार्यक्रमास मनाई असेल.
* कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंगबाबत प्रशिक्षण घ्यावे.
* जेवणामध्ये शक्यतो शिजवलेल्या पदार्थांचा समावेश असावा.
* हॉटेलमधील सीसीटीव्ही रेकॉर्ड जतन करण्यात यावे.