Skip to content Skip to footer

मनपात सात समित्यांच्या निवडणूक जिंकण्याचा मंत्री परब यांचा विश्वास

विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाने आपल्या जुन्या मित्र पक्षांची अर्थात भारतीय जनता पक्षाची साथ सोडत राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षासोबत राज्यात आघाडी स्थापन करत सत्ता हस्तगत केली त्यामुळे मनपात शिवसेना खालोखाल जास्त संख्याबळ असलेल्या भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी येणाऱ्या स्थायी समितीच्या निवडणुकीत उतरण्याचा चंग बांधला आहे.

त्यातच येणाऱ्या मुंबई महापालिकेतील स्थायी समितीसह इतर सात समित्यांच्या अध्यक्षपदाच्या होणाऱ्या निवडणुकीकडे सर्व पक्षाचे लक्ष लागून राहिले होते. यावर आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी वक्त्यव्य केले आहे.

महापालिकेत स्थायी समितीच्या निवडणुकीत उद्या काँग्रेस ऐन वेळी माघार घेईल. तसेच केवळ स्थायी समितीच नाही तर सर्वच्या सर्व समित्यांवर शिवसेनेचाच अध्यक्ष निवडून येईल असा विश्वास परब यांनी व्यक्त केले आहे. तसेच शिवसेना मनपातील आपला गड अबाधीत राखेल असे सुद्धा परब यांनी बोलून दाखविले आहे.

Leave a comment

0.0/5