Skip to content Skip to footer

शिवसेनेचा विजय : स्थायी समिती आणि शिक्षण समिती अध्यक्ष पद शिवसेनेकडे

शिवसेनेचा विजय : स्थायी समिती आणि शिक्षण समिती अध्यक्ष पद शिवसेनेकडे

मुंबई महानगर पालिकेत स्थायी समिती अध्यक्ष आणि शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी आज निवडणूक पार पडली. आज झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आघाडी धर्म पाळत या दोन्ही निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे या दोन्ही समित्यांचे अध्यक्षपद शिवसेनेकडे राहण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेस घेतलेल्या माघारीमुळे आत मुंबई महापालिकेच्या सर्वच समित्यांवर शिवसेनेचे सदस्य राहतील. त्यामुळे महापालिका पुन्हा एकदा शिवसेनेच्या हातात राहणार आहे.

 

या दोन्ही पदांवर शिवसेना पक्षाने आणि काँग्रेस पक्षाने आपले उमेदवार उभे केले होते. त्यात सेना, काँग्रेस आणि भाजपा अशी तिरंगी लढत होणाऱ्या निवडणुकीत शिवसेना पक्षाकडे अधिक संख्याबळ होते. त्यात निवडणूक लढवायची की येन वेळी उमेदवार मागे घ्यायचे असा पेच काँग्रेसपुढे निर्माण झाला होता. मात्र रविवारी पार पडलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीत काँग्रेसने आपले उमेवार मागे घेण्याचे निश्चित केले होते.

 

या मतदानाच्या वेळी काँग्रेस तटस्थ राहील, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष शिवसेनेला मतदान करणार आहेत. काँग्रेसने अर्ज मागे घेतला नसता तर भाजपने काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देऊन शिवसेनेच्या वर्चस्वाला आव्हान उभे केले असते, अशी चर्चा रंगली होती. मात्र आता आता शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या संध्या दोषी, तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे यशवंत जाधव यांची वर्णी लागणार आहे.

Leave a comment

0.0/5