‘अटल टनेल’चे उदघाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रिकाम्या बोगद्यात कॅमेऱ्याकडे पाहून
कोणीही नसताना हवेत हात हलवत असल्याचा फोटो प्रचंड वायरल झाला होता. यावर अनेक मिम्स सोशल मीडियावर बनवण्यात आले होते. आता यावर वंचित आघाडीचे सर्वेसर्वा, माजी खासदार प्रकाश आंबडेकर यांनी पंतप्रधान मोदींना चिमटा काढला आहे.
निर्मनुष्य असलेल्या बोगद्यात कोणाकडे पाहून नरेंद्र मोदी हात उंचावत होते. तेथे तर जनता उपस्थित नव्हती?. देशाला अनर्थतेच्या खाईत घेऊन जाणाऱ्या पंतप्रधानांच्या आरोग्यावर परिणाम तर झाला नाही ना?, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केलीये.
जनतेला पीएम मोदींच्या प्रकृतीची माहिती मिळायलाच हवी, विशेष म्हणजे यापूर्वीही आदरणीय महोदयांनी अनेकदा असे केले आहे, असे आंबेडकर यांनी प्रकाश माध्यमांना बोलून दाखविले होते.