माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेचा मावळा सज्ज.
बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्ष ५० जागा लढवणार आहे. याची माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली होती. यावर आता सुशांत प्रकरणात मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना टक्कर द्यायला शिवसेनेचा मावळा सज्ज झाला आहे, असे मत शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी वक्त केले आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.