सुशांतच्या प्रकरणी ८० हजार फेक अकाउंट्स काढणे हा किळसवाणा प्रकार! – सुप्रिया सुळे
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्राला आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी एकूण ८० हजार फेक अकाउंट्स काढण्यात आले, अशी खळबळजनक माहिती मुंबई पोलीस महासंचालक सिंह यांनी काल दिली होती. या दिलेल्या माहितीनंतर संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ माजली होती. यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे.
एखाद्याच्या मृत्यूनंतर ८० हजार फेक अकाऊंटस काढण्यात आली आणि एका पक्षाने त्याचा वापर राजकारणासाठी करण्याचा प्रयत्न केला. हे चित्रच निव्वळ धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार आहे. पुढे त्या म्हणाल्या की, तुमचा सत्ताधारी पक्षावर राग असेल. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत सत्तेवर यायचं असेल. पण असं कृत्य करून त्या दिशेने पावले टाकणे हा किळस आणणारा प्रकार आहे. आपली संस्कृती इतक्या खालच्या पातळीवर गेलीये, हे आपल्यासाठी अत्यंत खेदजनक आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.