Skip to content Skip to footer

खडसे यांच्यासोबत होणाऱ्या भेटीवर शरद पवार म्हणतात की….

खडसे यांच्यासोबत होणाऱ्या भेटीवर शरद पवार म्हणतात की….

भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेण्यासाठी कालच मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे आज एकनाथ खडसे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करू शकतात अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात बोलून दाखवली जात आहे. यावर प्रसार माध्यमांनी पवारांना आपण खडसे यांची भेट घेणार का? याबद्दल विचारले असता यावर पवारांनी भाष्य केले आहे.

यावर बोलताना शरद पवार बोलले की, “एकनाथ खडसेंसोबत भेटीचा कोणताही नियोजित कार्यक्रम नाही. त्यांच्या भेटीबद्दल अशी कोणती विनंतीही करण्यात आलेली नाही. उद्या मी दिल्लीला जाणार आहे. पण, आज अशी कोणतीही भेट नाही”. दरम्यान एकनाथ खडसे यांनी आपण वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईत आलो असल्याचे म्हटले आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचे वृत्त फेटाळले होते.

Leave a comment

0.0/5