Skip to content Skip to footer

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मंत्री रावसाहेब दानवे यांना दिली ‘व्हिलन’ची उपमा…

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मंत्री रावसाहेब दानवे यांना दिली ‘व्हिलन’ची उपमा…

शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे राज्यातील सरकार म्हणजे अमर, अकबर आणि अँथनीचे सरकार आहे, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुणे येथे एका पत्रकार परिषदेत केली होती. यावेळी उपस्थित पत्रकार समूहाशी चर्चा करताना दानवे यांनी ही टीका राज्यातील आघाडी सरकारवर केली होती. आता त्यांच्या या टीकेवर अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सुद्धा टोला हाणला आहे.

 

मंत्री दानवे यांच्या टीकेला उत्तर देताना देशमुख म्हणाले की, “महाराष्ट्र सरकार म्हणजे अमर, अकबर आणि अँथनीचे सरकार आहे. बरोबर आहे कारण आम्ही महाराष्ट्राच्या बदनामीचे प्रयत्न हाणून पाडतो आणि कोरोना काळातही राज्याला प्रगतीपथावर नेतो” अशी खमखमीत टीका देशमुख यांनी केली होती. आता या टिकेनंतर दानवे यांच्या वक्तव्यावर काँग्रेसनेही जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

 

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी रावसाहेब दानवे यांना त्या चित्रपटातील रॉबर्ट शेटची उपमा दिलेली आहे. जो “अमर अकबर अँड अँथनी” चित्रपटात एका व्हिलनची भूमिका निभावताना दाखवण्यात आला आहे.

Leave a comment

0.0/5