बिहार निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाचे स्टार प्रचारक निश्चित!
बिहार विधानसभा निवडणुकीच्या काही जागा यावेळी शिवसेना लढवणार आहे,अशी घोषणा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली होती. तसेच बिहार निवडणुकीला सामोरे जाण्याचे शिवसेना प्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा बोलून दाखविले होते.
त्यातच आता बिहार निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या स्टार कॅम्पनेर्सची यादी देखील जाहीर केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून २० जणांची स्टार कॅम्पेनरची नियुक्ती करण्यात आली आहे.
या स्टार कॅम्पेनर यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह २० जणांचा समावेश आहे. सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, राहूल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनील चिटणीस, योगराज शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी आणि अशोक तिवारी हे स्टार कॅम्पेनर असणार आहेत.