Skip to content Skip to footer

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या घोषणेनंतर काही तासातच कांजूरमार्ग येथे मेट्रोच्या कामाला सुरवात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी सोशल मीडियाच्या माद्यमातून संवाध साधला होता. यावेळी त्यांनी प्रस्तावित कारशेड प्रकल्प कांजूरमार्ग येथे स्थलांतरित करत असल्याची घोषणा केल्यानंतर काही तासातच कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेडच्या कामाला सुरुवात देखील झाली आहे. याचं पहिलं पाऊल म्हणजे याठिकाणी माती परीक्षणाला सुरुवात देखील झाली आहे.

या संदर्भात बोलताना प्रायवरां प्रेमी डी. स्टॅलिन म्हणाले की आज आमच्या ७ वर्षाच्या संघर्षाला यश आलेलं आहे. मागच्या सरकारमधील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही मेट्रोचे कारशेड आरे येथे न करता कांजूरमार्ग येथे करा अशी आम्ही विनंती करत होतो. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी आमचे न ऐकता कारशेड आरे येथेचं होणार असल्याचं जाहीर केलं आणि हजारो झाडे देखील तोडली.

झालेल्या कारवाही विरोधात ज्या पर्यावरण प्रेमींनी आंदोलने केली त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल केले परंतु सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेड येथे नेत असल्याचं जाहीर करताना आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेतं असल्याचं देखील जाहीर केलं. त्यामुळे या आंदोलनात काम करणाऱ्या पर्यावरणप्रेमींसाठी आजचा दिवस म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे असे म्हणून दाखविले होते.

Leave a comment

0.0/5