Skip to content Skip to footer

एकनाथ खडसे लवकरच करणार या पक्षात प्रवेश …

एकनाथ खडसे लवकरच करणार या पक्षात प्रवेश …

भाजपचे वरिष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराच्या बातम्या मागील काही दिवसांपासून प्रसिद्ध होताना दिसत आहे. मात्र खडसे यांच्या पक्ष प्रवेशाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही अशीच काहीशी परिस्थिती दिसून येत आहे. मात्र, माध्यमांमध्ये चालणाऱ्या या चर्चा खोट्या असल्याचे म्हणत आपण भाजप सोडणार नसल्याचे खडसेंनी सांगितलं होतं. परंतु आता एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित मानला जात आहे.

या संदर्भात लवकरच राष्ट्रवादी पक्षाकडून एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांकडून मिळाली आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करताच त्यांच्यावर पक्षाची महत्वाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी मधील प्रवेशानंतर इतरही काही नेते राष्ट्रवादीत येणार असल्याचं बोललं जात आहे. खडसे यांच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील अनेक नेते राष्ट्रवादीत दाखल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे आता खडसे यांच्या बरोबर राष्ट्रवादीत कोण येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Leave a comment

0.0/5