ते नुसते मुख्यमंत्री नसून शिवसेना पक्षप्रमुख सुद्धा आहेत ! – संजय राऊत
राज्यपाल भगत कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मंदिरे केव्हा उघडणार या संदर्भात विचारणा केली होती. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले होते. आता मुख्यमंत्र्यांच्या प्रतिउत्तरानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही राज्यपालांना उत्तर दिले आहे .
आज पत्रकार माध्यमांशी बोलताना राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे घटनेनुसार राज्याचे प्रमुख असतात. ज्या राज्यात राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेली आहे त्या राज्याचा कारभार घटनेनुसार चालत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांची केंद्रातून नियुक्ती करण्यात आलेली असते.
पुढे उदाहरण देताना राऊत म्हणाले की, चीनचे सैन्य जर लडाख सिमेवर घुसत असेल तर या संदर्भात बोलण्याचा अधिकारी मुख्यमंत्र्यांना नसतो. त्यावर फक्त देशाचे मंत्रीच बोलू शकतात, असे म्हणत राज्यपाल कोश्यारी यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव राऊत यांनी करून दिली होती.
तसेच महाराष्ट्र राज्यात जी कोरोनामुळे परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याविषयी काय निर्णय घ्यायचे आणि परिस्थिती कशी हाताळायची यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार लोकनियुक्त सरकार आणि मंत्रिमंडळाला असतो. त्याच्यामध्ये तुम्ही हिंदुत्ववादी आहात की नाही हा प्रश्न कोणाला पडू नये, असे ही राऊत म्हणाले.
पुढे बोलताना राऊत म्हणले की, उद्धव ठाकरे हे नुसते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत तर शिवसेना पक्षप्रमु त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाचे धडे घेण्याची तशी गरज नाही. आमचं हिंदुत्व पक्क आहे आणि भक्कम पायावर उभं आहे, असे राऊत यांनी बोलून दाखविले.